Sanjay Raut : काश्मिरी पंडितांना महाराष्ट्र सरकार आश्रय देणार, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती
तुम्ही आठ वर्ष कसले साजरी करताय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला केलाय.
मुंबई: शिवसेना आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये रोज वार-लटवार सुरू असतात. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) रोज सकाळी भाजपावर टीका करतात आणि त्यावर दिवसभर भाजपच्या नेत्यांकडून पलटवार येतो. हे चित्र आता रोजचं झालंय. आज काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदुंच्या (hindu) हत्येवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हत्या सुरू आहेत. तुम्ही आठ वर्ष कसले साजरी करताय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला केलाय. पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की, तुम्ही टीका करायला काय झालं? काश्मीर पंडित मरत आहेत. त्यावर बोला. टीका कसली करताय? पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनवर निवेदन दिलंय. महाराष्ट्राची सरकार आणि शिवसेना काश्मीर पंडितांच्या बाजूने राहिल, असं ते यावेळी म्हणाले.