आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले…
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 10 दिवस होत आले असून महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे. मात्र अजूनही सरकार स्थापन झालेलं नसून येत्या 5 तारखेला आझाद मैदानात हा शपथविधी होणार आहे.
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 10 दिवस होत आले असून महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे. मात्र अजूनही सरकार स्थापन झालेलं नसून येत्या 5 तारखेला आझाद मैदानात हा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, भाजप स्वत:कडे कोणती खाती ठेवणार, गृहखातं कोणाकडे असणार, शिंदे गट आणि अजित पवार गट या महायुतीतील इतर प्रमुख पक्षांच्या वाट्याला कोणती खाती येणार या सर्व प्रश्नांचं उत्तर येत्या 5 तारखेला मिळणार आहे.
याचदरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा, जल्लोषाचा क्षण 5 तारखेला येऊ घातला असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. जनतेने स्थिर सरकार दिलं असून या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे. मोठ्या उत्साहात हा शपथविधी होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार सरकार आता पुन्हा राज्यात दिसेल असं दरेकर म्हणाले. गृहखात्यावरू सुरू असलेली रस्सीखेच याबद्दलही ते स्पष्ट बोलले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसून यावर चर्चा करून निर्णय घेतील. त्यावर शीर्षस्थ नेतृत्व शिक्कामोर्तब करेल. हे चार भिंतीतल्या चर्चेतून सुटणार विषय आहेत. माध्यमांद्वारे हे माझं खातं हे तुझं खात असा हा चर्चेचा विषय नाही, असंही दरेकर यांनी स्पष्ट केलं.