एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Dec 02, 2024 | 1:14 PM

एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून आहे. याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीला जाणार का याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होत्या.  या सर्व प्रश्नांची आता शिंदे गटाच्याच नेत्याने स्पष्ट उत्तर दिली आहेत.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरी सत्ता स्थापनेचा मुहूर्त काही अद्याप सरकारला सापडलेला नाही. गेल्या दहा दिवसांपासून चर्चांच्या अनेक फेऱ्या झडत आहेत, मात्र नव्या सरकारचा शपथविधी कधी, नवा मुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळणार की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर अजूनही अनुत्तिरतच आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून आहे. याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीला जाणार का याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होत्या.  या सर्व प्रश्नांची आता शिंदे गटाच्याच नेत्याने स्पष्ट उत्तर दिली आहेत.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर स्पष्टच भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीला ( राजकारणात) जाणार नाहीत, असं शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं पद घेऊ नये, याबद्दल ते स्वत: निर्णय घेतील. पक्षप्रमुख म्हणून त्यांना तो अधिकार आहे. एकनाथ शिंदे हे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, काय होईल याचा सर्वस्वी निर्णय शिंदे साहेबांच्याच हाता आहे, असे शिरसाट यांनी नमूद केलं.

Published on: Dec 02, 2024 01:14 PM