कोरोना काळात महाराष्ट्राचं कौतुक झालंय- थोरात

कोरोना काळात महाराष्ट्राचं कौतुक झालंय- थोरात

| Updated on: Jul 04, 2022 | 2:36 PM

कोरोना संकट हे जागतिक पातळीचं होतं या संकट काळात महाविकास आघाडीच्या सरकारने जे काम केलं त्याचं कौतुक सर्वत्र झाले असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना महामारी आली, सरकारची दोन वर्ष त्यात गेली असतानाही मुंबईसाठी जे काम केले ते ऐतिहासिक असल्याचे थोरात म्हणाले. आज शिंदे गट आणि महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होती. […]

कोरोना संकट हे जागतिक पातळीचं होतं या संकट काळात महाविकास आघाडीच्या सरकारने जे काम केलं त्याचं कौतुक सर्वत्र झाले असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना महामारी आली, सरकारची दोन वर्ष त्यात गेली असतानाही मुंबईसाठी जे काम केले ते ऐतिहासिक असल्याचे थोरात म्हणाले. आज शिंदे गट आणि महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होती. या चाचणीत शिंदे आणि  भाजप  आपले बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरले आहेत. शिंदे गट आणि भाजप 164 मतं मिळाली तर महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली आहे. सभागृहात भाषण सुरु होतातच बाळासाहेब थोरातांनी महाविकास आघाडीच्या कामांबद्दल माहिती दिली. कोरोनाकाळात   धारावीसाख्या परिसराला कोरोनमुक्त कारण्यापासून ते ऑक्सिजनचा  झाल्यानंतर  व्यवस्थापनेच्या कार्यापर्यंत सर्वच काम आमच्या सरकारने सुयोग्य पद्धतीने केल्याचे थोरात म्हणाले.

Published on: Jul 04, 2022 02:36 PM
Maharashtra Assembly Session : भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल, पहिल्या दिवसापासून तुम्ही सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला, जाधव यांचा आरोप
Sudhir Mungantiwar: “एकवीरेची शपथ कुणी खोटी ठरवली?”, सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला