कोरोनामुळे काही जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, कडक लॉकडाऊनचा विचार : राजेश टोपे
कोरोनामुळे काही जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, कडक लॉकडाऊनचा विचार : राजेश टोपे
जालना: राज्यात कोरोना स्थिती बाबत राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवणार का, या बाबत भाष्य केलेय. 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती कमी झाली असली तरी राज्यातील काही जिल्ह्या मध्ये कोरोना स्थिती वाढत आहे आणि अशीच स्थिती राहिली तर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. आणि त्याबाबत पंधरा तारखेच्या दरम्यान विचार करण्यात येईल असे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील लॉकडाऊन आठ दिवसानंतर संपणार आहे. त्यामुळे राजेश टोपे यांचे हे विधान महत्वाचे आहे.