सीमाभागात मराठी टक्का असूनही एकीकरण समितीचा एकही उमेदवार जिंकला…

| Updated on: May 14, 2023 | 8:19 AM

तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालंय. तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला. एकाही जागी महाराष्ट्र एकीकरण समितीला विजय मिळवता आलेला नाही.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदा पहिल्यांदाच सहा मतदारसंघात निवडणूक लढविली. भाषांवार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या म. ए. समितीने यावेळी शड्डू ठोकला मात्र त्यांनी कानडी जनतेसह मराठी माणसानंही रोखल्याचेचं चित्र समोर आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत समितीचा सहा ही जागांवर दारूण पराभव झाला आहे. तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालंय. तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला. एकाही जागी महाराष्ट्र एकीकरण समितीला विजय मिळवता आलेला नाही. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 जागी काँग्रेसने विजय मिळवला तर 7 जागा भाजपने जिंकल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभागातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला. याची कारण काहीही असतील मात्र प्रमुख कारण हे महाराष्ट्रातील नेते मराठी उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते. यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश होतो. या नेत्यांनी सीमाभागात बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर या मतदारसंघांत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला फटका बसला. बेळगाव दक्षिणमध्ये रमाकांत कोंडुसकर, बेळगाव उत्तर उमेदवार अमर येळ्ळूरकर तर मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर. एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीणमधून पराभव स्वीकारावा लागला आहे.

Published on: May 14, 2023 08:19 AM
कर्नाटक विजयाने मविआत उत्साह! महाराष्ट्रात कोणत्या समिकरणांची नांदी
कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘काल भाजप, आज काँग्रेस, तर उद्या…’