Video : बोगस बियाण्यांची होळी करत बियाणे विक्रेत्यांकडून निषेध; पाहा…
Holi : जळगावमध्ये बोगस बियाण्यांचा विरोध करत बियाणे विक्रेत्यांनी बोगस बियाणांची होळी केली आहे. बियाणे विक्रेत्यांनी एकत्रित येत बोगस बियाणांचा निषेध केला आहे. पाहा व्हीडिओ...
जळगाव : आज होळीचा सण आहे. विविध ठिकाणी होळी साजरी केली जात आहे. जळगावात मात्र एका वेगळ्या होळीची चर्चा होतेय. जळगावमध्ये बोगस बियाण्यांचा विरोध करत बियाणे विक्रेत्यांनी बोगस बियाणांची होळी केली आहे. बियाणे विक्रेत्यांनी एकत्रित येत बोगस बियाणांचा निषेध केला आहे. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान याकडे बियाणे विक्रेत्यांनी लक्ष वेधलं आहे. बोगस बियाणांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसंच चांगलं बियाणं उपलब्ध करून देण्याचीही विनंती विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
Published on: Mar 06, 2023 03:35 PM