‘मॅजेस्टिक आमदार निवास’ इमारतीचा कायापालट होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

| Updated on: Mar 25, 2023 | 11:32 AM

मुंबईतील महत्त्वाची वारसावास्तू असलेल्या 'मॅजेस्टिक आमदार निवास' इमारत नूतनीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि इतर नेते, अधिकारी उपस्थितीत होते.

मुंबई : मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या मॅजेस्टिक आमदार निवासाचा आता लवकरच कायापालट होणार आहे. मॅजेस्टिक ही इमारत 1909 मध्ये बांधलेली आहे. मुंबई शहरातील सुरूवातीच्या हॉटेल पैकी हे एक आहे.याची रचना वास्तू विशारद डब्लूए चेंबर यांनी केली आहे. मॅजेस्टिक ही इमारत 1960 नंतर महाराष्ट्र सरकारने आपल्या ताब्यात घेतली. विधानसभेच्या सदस्यांसाठी वसतिगृहात त्याचं रूपांतर करण्यात आलं. आता ही इमारत जुनी झाला आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत. या इमारतीच्या संवर्धनासाठी काही बदल केले जाणार आहेत. संरचनेच्या बाह्य दर्शनी भागाला त्याच्या पूर्वीच्या वैभवाचं जतन करत पीडब्ल्यूडीकडून डागडुजी करण्यात येणार आहे.

Published on: Mar 25, 2023 11:32 AM
बिचुकलेंच मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मागणी
हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढा अन् 5 आमदार निवडून आणून दाखवा; संजय राऊत यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान