फोनवर फोन अन् मेसेजचा भडीमार; अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच ऑफर
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेने अप्रत्यक्षरीत्या धमकावलं. त्यांच्या विरोधात कट रचून 1 कोटींची लाच ऑफर केली. पाहा प्रकरण काय आहे...
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार एका डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेने अप्रत्यक्षरीत्या धमकावलं. त्यांच्या विरोधात कट रचून 1 कोटींची लाच ऑफर केली. संबंधित आरोपी महिला जवळपास 16 महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी या महिलेने केली आहे. तुम्हाला 1 कोटी देऊ, अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी दिली होती. अमृता फडणवीस यांना फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी महिला डिझायनर असल्याने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. आरोपी महिलेचे नाव अनिष्का असे असून तिच्या वडिलांनाही या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं आहे.