संजय राऊत यांचं एखाद्या ज्योतिषासारखं झालंय, ते काही बोलतात!; कुणाचं टीकास्त्र

| Updated on: Mar 28, 2023 | 2:47 PM

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य नसतं, काहीही बोलतात, असं म्हणत संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे. कुणी केला हा घणाघात? पाहा...

मुंबई : संजय राऊत यांचं एखाद्या ज्योतिषासारखं झालंय. ते काय काहीही बोलतात आणि काही विधान करतात त्यांच्या बोलण्याला काही तथ्य नसतं, असं मंत्री दीपक केसरकर म्हणालेत. या राज्यामध्ये कोण कुणाचं गुलाम झालं आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यांनी विचारधारा गहाण ठेवली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत संगत केली आहे. तेव्हाच ठाकरेगट त्यांचा गुलाम झाला, असं राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत जे विधान केलं ते चुकीचं आहे. जर बाळासाहेब ठाकरे असते तर या मुद्द्यावर त्यांनी लगेच युती तोडून टाकली असती. पण यांच्यात हिंमत नाही. उद्धव ठाकरेजी, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आघाडी तोडा, मविआतून बाहेर पडा, असं आव्हानही केसरकरांनी दिलं आहे.

Published on: Mar 28, 2023 02:47 PM
मनसे नेते अविनाश जाधव यांना ‘त्या’ अल्टिमेटमनंतर मुंब्रा बंदीची नोटीस
हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागीदार ईडीच्या रडारवर, पुन्हा बजावलं समन्स