अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार? अंजली दमानिया यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
हा तर भाजपचा बी प्लॅन!; अंजली दमानिया यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 15 आमदार योग्य ठरले बाद झाले नाही तर त्यांच्याबरोबरच आपल्या संसारात थाटायचा. नाहीतर प्लॅन बी तयार असायला हवा म्हणून ED चा दबाव टाकून केलेला प्रयत्न आहे. मंत्रालयात परिचयाचे आहेत. त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळेस प्रत्येकांचं हेच मत होतं की अजित पवार हे भाजपसोबत आहेत . कधीही ते भाजप सोबत जातील. आश्चर्य वाटायचं मात्र त्याच्यानंतर भाजपच्या सपोर्टमध्ये जे स्टेटमेंट झालेलं त्यामुळे मला असं वाटायला लागले की नाही हे बरोबर आहे. 15 आमदार हे लवकरच बाद होतील आणि ते बाद झाल्यावर अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाणार असा प्लॅन आहे. राजकारण कुठल्या स्तराला जाईल सांगता येणार नाही. सध्या राजकीय परिस्थिती वाईट आहे, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.