Nashik Oxygen Leak Video: अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला, फडफड करुन मम्मी मेली, नाशिकच्या ‘त्या’ मुलीचा आक्रोश
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव गमावला. Nashik Oxygen Leak Video
नाशिक: डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव गमावला. यामध्ये एका महिलेनं जीव गमावला हे कळताच तिच्या मुलीनं आक्रोश व्यक्त केला. ईला 2 दिवस वेटिंगवर ठेवलं, हे काय हॉटेल आहे का?, दोन दिवस माझी मम्मी वेटिंगवर ठेवली. जसं आम्ही नोकरी मागायला आलो होतो. माझी मम्मी बरी झाली होती. अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला, फडफड करुन ती मेली, कोणी आलं नाही तिच्यासाठी मरुन गेली, अशी भावना त्या मुलीनं व्यक्त केली. वार्डमध्ये जेवढे पेशंट होते तेवढे सगळे मेले, असही त्यांनी सांगितलं.