Video | ‘राजकारणात टीकायचं असेल तर….,’ काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Mar 09, 2024 | 1:24 PM

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारायचे काम कित्येक वर्षे सुरु आहे. खरी स्मारके तर महाराजांचे गडकिल्ले आहेत. त्यांना जपायला हवे, उद्याच्या पिढीला आपण केवळ महापुरुषांचे पुतळे दाखविणार का ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

नाशिक | 9 मार्च 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन आज नाशिक येथे साजरा करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले की, ‘आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश दिसते हे त्यांच्या एकट्याचे यश नाही. हे यश त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश आहे. मी गेली अनेक वर्षे चढ-उतार पाहीले. उतारच जास्त पाहीले, चढ फार कमी पाहीले. परंतू यश मी तुम्हाला देणारच. राजकारणात टिकायचे असेल तर तुमच्याकडे पेशन्स हवे असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगावे. मला माझ्याकडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यांची पोरं खेळवण्यात सुख मिळत आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी भाजपाचे नाव न उच्चारता केली. मला माझ्या पोरांना मोठं करायचं आहे, तेवढी ताकद माझ्यात आहे असेही राज ठाकरे म्हणाले. आपल्या आधी दहा वर्षे आधी राष्ट्रवादी पक्ष जन्माला आला. राष्ट्रवादी पक्ष नाही तर निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. खरे पक्ष जनसंघ-भाजपा, शिवसेना त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे राज ठाकरे यांनी ठणकावले. अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक कित्येक वर्षे सुरु आहे. परंतू समुद्रात त्यासाठी भर टाकावी लागणार आहे. आणि त्याचा खर्च प्रचंड मोठा आहे. त्यासाठी 25 हजार ते 35 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे ते म्हणाले. उद्या भावी पिढीला आपण केवळ स्मारके दाखविणार का ? खरी स्मारके तर शिवरायांचे गडकिल्ले असून त्यांना जपायची गरज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Published on: Mar 09, 2024 01:17 PM
रोहित पवार यांना मोठा धक्का, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त, काय आहे प्रकरण?
Video | ‘सगळे आतून एकच आहेत. तुम्हाला फक्त…,’ काय म्हणाले राज ठाकरे