मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे यांची मोर्चे बांधणी

| Updated on: May 12, 2023 | 10:02 AM

ते शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ठाणे, मिरा भाईंदर, वसई विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापुर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईचा दौरा करणार आहेत.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नुकताच कोकण दौरा पार पडला. यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या ठाणेकडे वळवला आहे. ज्यामुळे ठाण्यात सध्या मनसैनिकांत उत्साह पहायला मिळत आहे. ते शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस ठाणे (Thane)जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ठाणे, मिरा भाईंदर, वसई विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापुर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईचा दौरा करणार आहेत. तर विविध विधानसभा मतदार संघानिहाय ते मोर्चे बांधणी करणार असून येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published on: May 12, 2023 10:02 AM
सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; थेट ‘या’ धरणातूनच पिण्यासाठी पाणीपुरवठा!
‘तर जे झालं ते झालं…’, कोर्टाच्या निर्णयावर भगतसिंह कोश्यारी यांचं मोठं वक्तव्य