माहिम कारावईनंतर बावनकुळे म्हणाले, अतिक्रमण काढणे म्हणजे…

| Updated on: Mar 23, 2023 | 10:42 AM

राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं काही म्हटलं नाही. तसेच अतिक्रमण काढणे म्हणजे तेढ निर्माण करणे होत नाही असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताच याठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच तसेच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकर आणि राज ठाकरे यांचं अभिनंदन केले. तर अशा अनेक गोष्टी असतात की सरकारपर्यंत येत नाही. त्यातील काही राज ठाकरे यांनी सांगितल्या. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ त्या यासंदर्भात कारवाई केली.

सांगलीतही तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं आहे. नागपूरातंही एका डीपी रोडवर अतिक्रमण झालंय. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथे कारवाई व्हावी, ते कुठल्याही धर्माचं असोत. मंदिर असोत की मस्जीद. तर राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं काही म्हटलं नाही. तसेच अतिक्रमण काढणे म्हणजे तेढ निर्माण करणे होत नाही असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 23, 2023 10:42 AM
काल इशारा अन् आज कारवाई; माहिम पाठोपाठ सांगलीतही हालचालींना वेग
नीलम गोऱ्हे यांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक; सरकारमधील मंत्री, उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार