Sandeep Deshpande | Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात मनसेची सदस्य नोंदणी जनजागृती प्रभातफेरी

| Updated on: Aug 28, 2022 | 11:43 AM

मराठी माणसाचा आधार वाढवणारा हा पक्ष आहे. तर या आपल्याला पक्षाचा सदस्य कशा पद्धतीने होता येईल ही जनजागृती करण्यासाठी आपण प्रभात फेरी काढत असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रचाराचा नारळ फोडत अनेकांवर टीकेची तोफ डागली होती. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मनसेची सदस्य नोंदणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अनेक ठिकाणी सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दरम्यान संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारांची जनजागृती व्हावी, मनसेचा अजेंडा, भूमिका त्यांच्या पर्यंत जावी म्हणून जनजागृती प्रभातफेरी देखिल काढण्यात येत आहे. यावेळी ही जनजागृती प्रभातफेरी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात काढण्यात आलेली आहे. तसेच मराठी माणसाचा आधार वाढवणारा हा पक्ष आहे. तर या आपल्याला पक्षाचा सदस्य कशा पद्धतीने होता येईल ही जनजागृती करण्यासाठी आपण प्रभात फेरी काढत असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.

Published on: Aug 28, 2022 11:43 AM
Mohit Kamboj on Rohit Pawar | ‘घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचं पवारांचं काम’-tv9
Jayant Patil On Shinde Fadnavis Govt | शिंदे सरकारच्या स्थापनेसाठी काही देवाण-घेवाण झालेली दिसतेय