टीझरमध्येच खोके, राजीनामा अन् गद्दारीचा उल्लेख; राज ठाकरे कोणाचे कान टोचणार? रत्नागिरीत काय साधणार?

| Updated on: May 06, 2023 | 7:13 AM

रत्नागिरीतील सभेबाबत जारी केलेला हा टीझर सोशल मीडियात चांगलात व्हायरल होत आहे. या टीझरमध्ये मनसेनं सध्याच्या राज्यातील राजकारणावर चांगलाच समाचार घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेतून राज ठाकरे कुणावर टीका करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? या चर्चांना उधाण आलं आहे. रत्नागिरीतील सभेबाबत जारी केलेला हा टीझर सोशल मीडियात चांगलात व्हायरल होत आहे. या टीझरमध्ये मनसेनं सध्याच्या राज्यातील राजकारणावर चांगलाच समाचार घेतला आहे. याच्यात आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप, सूडभावना, राजकीय चिखल, खोके, उठाव, नाराजीनामा, राजीनामा, फोडाफोडी, गद्दारी, गलिच्छ भाषा आणि बंड या शब्दांचा वापर करण्यात आल्याचं दिसत आहे. तर राज ठाकरेंच्या आवाजात सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू… असं म्हटलं आहे.

Published on: May 06, 2023 07:13 AM
‘टायगर इज बँक’, शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची घोषणा
Special Report | शरद पवार यांची निवृत्ती मागे, बडे नेते पत्रकार परिषदेत पण अजित दादाच नव्हते? काय आहे कारण?