मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है!; आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर नितेश राणे यांचा पलटवार

| Updated on: Apr 13, 2023 | 7:53 AM

Nitesh Rane Tweet on Aditya Thackeray Statment : गप्प करायला किती पैसे दिले याचा लवकरच गौप्यस्फोट करावा लागेल, असं नितेश राणे म्हणाले आहेत. पाहा व्हीडिओ...

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. दिशा सालियान केसचा संदर्भ नितेश राणे यांनी दिलाय. “जेलच्या भितीने एकनाथ शिंदेसाहेब भाजपबरोबर गेले.मग penguin आणि UT ने Disha salain च्या केस च्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!! ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

Published on: Apr 13, 2023 07:52 AM
Eknath Khadse : दमानियांचा दावाच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने खोडून काढला; फक्त पवारांना बदनाम करण्यासाठी ‘हे’
मी ‘या’ राजकारणाकडे बघतच नाहीत; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?