Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; तोडगा कधी?

| Updated on: Mar 15, 2023 | 7:25 AM

Government Employees on Strike : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. पाहा...

मुंबई : राज्यभरात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपात तब्बल 18 लाख सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात राज्य सरकारी, निम सरकारी,जिल्हा परिषद, महसूल, आरोग्यविभाग महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संपामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. रूग्णांना सुविधा मिळत नाहीयेत. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजही हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. ठिकठिकाणी सरकार विरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. तसंच रास्ता रोकोही करण्यात येणार आहे.

Published on: Mar 15, 2023 07:25 AM
सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच, तोडगा कसा निघणार? बघा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
कुस्ती रंगण्याच्या आधीच वाद; पुणे की सांगली, कोठे होणार महाराष्ट्र केसरी ?