मणिपूरच्या घटनेवर विरोधक आक्रमक, काँग्रेस आमदारांची विधानसभेत जोरदार घोषणाबाजी!

| Updated on: Jul 21, 2023 | 2:02 PM

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज सभागृहात मणिपूरच्या घटनेवर विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले. सुरूवातीलाच विरोधी पक्षातील महिला आमदारांनी मणिपूर घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला.

मुंबई, 21 जुलै 2023 | विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज सभागृहात विरोधक मणिपूरच्या घटनेवरून आक्रमक झाल्याचे दिसले. सुरूवातीलाच विरोधी पक्षातील महिला आमदारांनी मणिपूर घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या मणिपूरच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या. अखेर या प्रकरणावरुन विरोधकांनी सभात्याग केला. मणिपूरच्या घटनेवर सरकार बोलू देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्याक केली.

Published on: Jul 21, 2023 02:00 PM
मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर!
“मणिपूर घटनेवर विधानसभेत आम्हाला बोलू दिलं नाही”, वर्षा गायकवाड यांचा आरोप