स्टेशन उडविण्याची धमकी, एकच पळापळ, पोलीस अलर्ट
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच काल रात्री पोलीस स्टेशन उडवून देण्याची धमकी आल्यानं यंत्रणा सतर्क झाली आहे.
पुणे : देशासह, राज्यात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क असून कुठेही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
अशातच काल रात्री पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानं एकच खळबळ माजली आहे. अज्ञात व्यक्तीनं ही धमकी दिली आहे. रेल्वे पोलिसांनी ही धमकी गांभीर्यांने घेत तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेतली.
रेल्वे स्थानकात येणाऱ्या एक्सप्रेस थांबविण्यात आल्या. श्वान पथकाच्या सहाय्याने बॉम्बचा शोध घेतला. प्रवाशांमध्ये ही बातमी पसरताच त्यांची एकच पळापळ सुरु झाली. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. पोलिस काही हाती लागलं नाही. मात्र, रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून खबरदारी घेत आहे.