Special Report : उद्धव ठाकरे यांची एक चूक; काय म्हटलयं सुप्रीम कोर्टानं
त्यामुळे नेमकं काय घडलंय? सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं टिप्पणी करताना काय म्हटलंय? तर उद्धव ठाकरे यांनी काय चूक केली?
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला असून, न्यायालयाने अनेक गोष्टींचा उल्लेख निकाल देतांना उल्लेख केला आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांच्यावर काही टिप्पणी करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे याचंच सरकार असेल हे सिद्ध झालं आहे. तर उद्धव ठाकरेंना 29 जून 2022 या दिवसाची आठवण करवून देत त्यांच्या चूका दाखवून दिल्या आहेत. तर त्यांनी ती चूक केली नसती तर ते आज या राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री असते असेही न्यायालयाने म्हटलं आहे. तर राजीनामा दिल्यानं, सर्वात आधी मुख्यमंत्रिपद गमावलं, राजीनामा दिल्यानं, शिवसेना पक्षही गमावला, राजीनामा दिल्यानं, धनुष्यबाण चिन्हंही गमावलं. त्यामुळे नेमकं काय घडलंय? सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं टिप्पणी करताना काय म्हटलंय? तर उद्धव ठाकरे यांनी काय चूक केली यावर हा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट !