Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्ष निकालावर अजित पवार म्हणाले, आमची चूक झाली
त्यांनी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यानंतरही ते पद रिक्त ठेवणे आमची चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे.
पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी या निकालाच्या संदर्भात आपण लातूर दौऱ्यावर असतानाच प्रतिक्रिया दिली होती. अन् झालं ही तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आत्ताच्या विधानसभा अध्यक्षांकडे आला. मात्र ज्याप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देऊन चुकी केली तशीच चूक आम्ही देखिल केली अशी कबूली अजित पवार यांनी दिली आहे. त्यांनी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यानंतरही ते पद रिक्त ठेवणे आमची चूक झाली अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे. सत्तांतर घडल्यानंतर भाजपा-शिवसेनेने तात्काळ विधानसभा अध्यक्षपद बहुमताने भरले असते, तर आमचा अध्यक्ष असता. ते 16 आमदार त्यावेळीस अपात्र ठरले असते असं त्यांनी म्हटलं.