फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील राहुल जगताप हे शरद पवारांसोबतच थांबले होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयामध्ये अजित पवार यांच्या पक्षालाही चांगल यश मिळालं. आता अजित पवार हे शरद पवार यांच्यासह ठाकरे गटालाही धक्का देण्याच्या तयारीत आहेत. श्रीगोंदा विधानसभेत बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगातप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मंत्रीमंडळ विस्तारानंतर राहुल जगातप हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील अपूर्व हिरे यांनीदेखील अजित पवार यांची भेट घेतली. माजी आमदार अपूर्व हिरे पवार गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील राहुल जगताप हे शरद पवारांसोबतच थांबले होते. मात्र आता ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून जगताप हे लवकरच वेगळा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळ विस्तारानंतर जगताप हे पवार गटात जातील अशी चर्चा आहे.