‘राज्याच्या सध्याच्या राजकारणावर घाणेरडे मिम्स?’ राष्ट्रवादी नेत्यानं फडणवीस यांच्यावर तोफ डागली
त्यांनी आणि त्यांच्या गटातील 8 ते 9 जणांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्री पदाच्या शपथा घेतल्या. यानंतर राज्यातील विरोधकांसह सामान्य जनतेने देखील याचा चांगलाच विरोध केला. याबाबत जनतेचा रोष सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.
जळगाव : राज्यातील राजकारण अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या एकच राजकीय भूकंप आणला. त्यांनी आणि त्यांच्या गटातील 8 ते 9 जणांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्री पदाच्या शपथा घेतल्या. यानंतर राज्यातील विरोधकांसह सामान्य जनतेने देखील याचा चांगलाच विरोध केला. याबाबत जनतेचा रोष सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खडसे यांनी यावेळी, महाराष्ट्रात सध्या किळसवाणे राजकारण सुरू आहे. सोशल मीडियावरही याबाबत अतिशय घाणेरडे मिम्स येत आहेत. अविवाहित राहू पण राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही असं ठासून सांगणारेच राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसलेत असा टोला लगावत फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. बऱ्याचदा अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर विधानसभा सभागृहात व बाहेरही विषारी टीका केली होती. एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं होतं. आता तेच सत्तेत हातात हात घालून एकत्र आले आहेत. हे राज्यातील जनतेला काही पटलेलं नाही. त्यामुळेच याविषयी सोशल मीडियावर जनतेत एक संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत जनतेला आता राज्यात महाविकास आघाडी हाच पर्याय पर्याय दिसत आहे असेही खडसे म्हणाले.