संजय राऊत यांच्यावर कोणाचे टीकास्त्र? म्हणाला, ‘चिठ्ठी काढणारा पोपट’
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र याचदरम्यान युतीत अजित पवार आणि त्यांचा गट सामील झाल्याने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ती नाराजी साफ दिसते अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी मोठा राजकीय भूकंप केला. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीवर आपला दावा सांगितला. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र याचदरम्यान युतीत अजित पवार आणि त्यांचा गट सामील झाल्याने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर ती नाराजी साफ दिसते अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, त्यांच्याकडे तुम्ही गांभीर्याने घेत जाऊ नका, असे देसाई यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांच्या येण्याने युती मजबूत झाली असून आमचे सर्व आमदार 100 टक्के खुश आहेत. कोणीही नाराज नाही.