बारसू रिफायनरीवरून मुख्यमंत्र्यांची डोळेझाक; राऊत यांची शिंदेवर टीका, काय केली मागणी?

| Updated on: Apr 29, 2023 | 11:56 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणावरही लाठीचार्ज झाला नाही असे सांगत आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) हे बारसूमध्ये रिफायनरीवरून चांगलेच तापलेलं दिसत आहे. बारसूमध्ये रिफायनरीचा (Barsu Refinery) विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर पोलीसांकडून लाठीचार्ज केला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. यावरून ठाकरे गट आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोणावरही लाठीचार्ज झाला नाही असे सांगत आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या रत्नागिरीतील जिल्हाधिकाऱ्याला हटवा, अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही. ते डोळेझाक करत आहेत. त्यांना अधिकारी फसवतात, खोटी माहिती देत आहेत असा घणाघात केला आहे. तर हा सर्व खटाटोप फक्त एका इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी केला जात असून मराठी माणसावर हल्ला हे सरकार करतंय, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

Published on: Apr 29, 2023 11:56 AM
‘एकच वादा अजित दादा’, आता कुठे झळकले भावी मुख्यमंत्रीचे बॅनर्स; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू
वादळं, गारा अन् अवकाळीचा हाहाकार, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान; दोघांचा मृत्यू