मंत्र्यांना डच्चू आणि नारळाच्या अफवेवर शिंदे गटाचा मंत्री देसाई भडकले; दिलं थेट आव्हान!

| Updated on: Jun 13, 2023 | 4:23 PM

कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संजय राठोड या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या सूचना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिल्याचं सांगण्यात येत होतं. त्यावरून आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्याकाही दिवसांपासून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र याचबरोबर मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार अशा बातम्यांही जोर धरू लागला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून नावासह माहिती देण्यात आली. तर कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संजय राठोड या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या सूचना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिल्याचं सांगण्यात येत होतं. त्यावरून आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी या बातम्यांमध्ये काहीही तथ्थ नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. तर थेट प्रसारमाध्यमांसह ज्यानं या बातम्या पेरल्या त्यालाच आव्हान दिलं आहे. त्यांनी, फोटो लावून आणि नावं घेऊन वर्तमानपत्र आणि प्रसार वाहिन्यांनी ज्या मंत्र्यांच्या बातम्या चालवल्या त्यांना आपलं आव्हान आहे. जर या बातम्या जर खोट्या ठरल्या तर तुम्ही माफी मागणार का?

Published on: Jun 13, 2023 04:23 PM
“शिंदे-फडणवीस यांना कर्माची फळ भोगावी लागतील”, ठाकरे गटाचा इशारा
“एकनाथ शिंदे फडणवीसांचा एवढा अपमान करतील वाटलं नव्हतं”, काँग्रेस नेत्याची टीका