राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप; विधानसभा अध्यक्षांनी धाडली शिंदे गटासह ठाकरे गटाला नोटीस?
आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांना धक्का दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील शरद पवार यांना धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. हे धक्के सध्या राज्यातील सामान्यांसह राजकीय नेते झेलत आहेत.
मुंबई : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठं मोठं राजकीय भूकंप होताना दिसत आहेत. एक वर्षांपुर्वी एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवून आणत 40 आमदार आपल्या सोबत घेत शिवसेना फोडली. त्यानंतर आता पर्यंत शिवसेना ठाकरे गटाला गळत लागली आहे. आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांना धक्का दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील शरद पवार यांना धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. हे धक्के सध्या राज्यातील सामान्यांसह राजकीय नेते झेलत आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटासह उद्धव ठाकरे गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना म्हणं मांडण्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. यावरून शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी, विधानसभा अध्यक्षांची नोटीस अजून मिळालेली नाही. तर ही नोटीस कायदेशिर प्रक्रियेतील एक बाब असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ही नोटीस फक्त आम्हालाच नाही तर ठाकरे गटाला देखिल देण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिलं जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.