सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ विधानावरून ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे विरुद्ध शिंदे सत्ता संघर्षाबाबत मोठा निकाल देताना राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तसेच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही सर्वोच्च न्यायालयाने बेकादेशीर ठरवली. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा याबद्दलही वक्तव्य केलं होतं
मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंद-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यालयाने केलेल्या त्या टिपण्णीची आठवण करून दिली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने “जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं,” असं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे सध्याचं राज्यातील सत्ताधारी सरकार, शिंदे-फडणवीस हे पुर्णपणे बेकायदेशिर आहे. जर मी राजीनामा दिला नसता तर आज पुन्हा मिच मुख्यमंत्री असतो असेही ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे विरुद्ध शिंदे सत्ता संघर्षाबाबत मोठा निकाल देताना राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तसेच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही सर्वोच्च न्यायालयाने बेकादेशीर ठरवली. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा याबद्दलही वक्तव्य केलं होतं