Maharashtra Politics : मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर राऊत भडकले; म्हणाले, ‘दोन घटनाबाह्य व्यक्ती’
कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने आता राज्यातील राजकीय वारावरण चांगलेच तापलं आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे चांगलेच भडकले.
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ठाकरे गटाच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावर ठाकरे गटाकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे. याचदरम्यान कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने आता राज्यातील राजकीय वारावरण चांगलेच तापलं आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे चांगलेच भडकले. तसेच त्यांनी या भेटीवर टीका करताना, कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत असं म्हटलं आहे. तर कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा मोठा अपमान केला. ते अपराधी आहेत. ते किती मोठे अपराधी आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला जर मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्र हे सगळं काही पाहतोय. घटनाबाह्य पद्धतीने काम करुन एक सरकार त्यांनी आणलं. त्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला ते भेटायला गेले असतील. त्यामुळे हे ते दोन घटनाबाह्य व्यक्ती बघून घेतील. आम्ही त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. तर कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळ लवकरच भेटणार आणि कायदेशीर मार्गाने भेटणार असंही राऊत यांनी म्हटलं आहे.