उद्धव ठाकरे यांचा 9 आणि 10 जुलैला विदर्भ दौरा, मात्र त्याआधीच का होतेय इतकी चर्चा?

| Updated on: Jul 08, 2023 | 10:18 AM

तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. ते येत्या 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत.

अमरावती : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्धार केला आहे. ते आता थेट मैदानात उतरले आहेत. तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. ते येत्या 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याचदरम्यान ठाकरे यांच्या स्वागतार्ह अमरावती शहरात भव्य पोस्टर्स लागल्याचे पहायला मिळत आहेत. ज्यावर भावी पंतप्रधान असा उल्लेख पहायला मिळत आहे. ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे बॅनर लावले आहेत. ज्यावर हिंदूस्तानचे भाग्यविधाते, भावी पंतप्रधान असा उल्लेख आहे.

Published on: Jul 08, 2023 10:18 AM