पटोले यांच्या नाराजीवर; राष्ट्रवादी नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, चांगली गोष्ट आहे….

| Updated on: May 21, 2023 | 2:43 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मोठा भाऊ या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया आधीच दिल्या आहेत.

पुणे : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना महत्व आलं अलतानाच महाविकास आघाडीत मात्र जागावाटपावरून वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मोठा भाऊ या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया आधीच दिल्या आहेत. त्यावरून खासदार सुप्रिया सूळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात विकासकामे यामध्ये खूप व्यस्त आहोत. त्यामुळे कोण काय बोलल आहे याची माहिती नाही. तर शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे समंजसपणाने आम्ही प्रश्न सोडवू सोडवू. पण अजित पवार हे राष्ट्रवादीतील एक महत्वाचे नेते आहेत. ते बोलले असतील. पण नाना पटोलेंना काही वाईट वाटलं असेल तर आपण स्वतः त्यांच्याशी बोलू असे त्या म्हणाल्या आहेत. तर पटोले यांनी आम्ही दुजाभाव करत नाही यावर ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

 

Published on: May 21, 2023 02:43 PM
सांगलीत 83 लाखांच्या फसवणूक प्रकरणी 4 अटक; काय आहे नेमकं प्रकरण?
नव्या संसद भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नकोच; ‘या’ काँग्रेस नेत्याचं ट्विट चर्चेत