रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
रेमडेसिवीरचा साठा करून ठेवल्याबद्दल ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. Maharashtra Remdesivir Political drama
मुंबई: रेमडेसिवीरचा साठा करून ठेवल्याबद्दल ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना फैलावर घेतलं. त्यानंतर डोकानिया यांना पोलिसांनी सोडून दिलं. यानंतर आज सकाळी नवाब मलिक यांनी भाजपवर तोफ डागली. एकूणच रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.