जाहिरातीवरून घमासान! भाजप नेत्याकडून सुचक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कुणाचं महत्व…’
राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्व्हे झाला आणि त्याची जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. यावरून सध्या ठाकरे गटात आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप पाहण्यात येत आहेत. त्यातच या जाहिरातीमधून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो गायब झाल्यानं उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
मुंबई : राज्यातील राजकारणात उलता पालथ झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार हे सत्तेवर आलं आहे. त्यानंतर आता या सरकारला 1 वर्षही पुर्ण होतं आहे. त्याचदरम्यान राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्व्हे झाला आणि त्याची जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. यावरून सध्या ठाकरे गटात आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप पाहण्यात येत आहेत. त्यातच या जाहिरातीमधून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो गायब झाल्यानं उलट सुलट चर्चा सुरू आहेत. अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे शिंदे गटाकडून भाजपला शह भाजपचं महत्व कमी करण्याचं काम सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, अशा जाहिरातींमुळे कुणाचं महत्व कुणामुळे कधी कमी होत नाही असं म्हटलं आहे. तर सगळं जनता ठरवते. त्यामुळं जाहिरातीमधील सर्वेक्षणामधील पसंतीला महत्व नसतं. 2024 च्या निवडणुकीमध्ये कोणाला काय पसंती मिळणार याला जास्त अर्थ आहे. मात्र हे नक्की आहे की महाराष्ट्राच्या जनतेला केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून आपेक्षा आहेत. तर युतीत कोण लहान कोण मोठं याला महत्व नाही.