जाहिरातीवर शंभूराज देसाई याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘कालची जाहिरात शिवसेना…’

| Updated on: Jun 14, 2023 | 4:50 PM

उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यानंतर शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी त्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही. ही जाहिरात शिंदे आणि फडणवीस यांच्या शुभचिंतकांनीच दिली असावी, असे देसाई यांनी सांगितले होते.

Follow us on

मुंबई : राज्यात शिंदे गटाच्या एका जाहिरातीनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ही जाहिरात मंगळवारी देण्यात आली होती. ज्यात ‘देशात मोदी आणि राज्यात शिंदे’ असा नारा देण्यात आला होता. तर त्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वापरण्यात आले नव्हते. यावरून उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यानंतर शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी त्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही. ही जाहिरात शिंदे आणि फडणवीस यांच्या शुभचिंतकांनीच दिली असावी, असे देसाई यांनी सांगितले होते. त्यानंतर आता त्यांनी आजच्या आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादंगावरून स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, काल शिवसेनेच्या वतीने मी आणि केसरकरांनी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. कालची जाहिरात शिवसेना पक्षाने दिलेली नव्हती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. आजची जाहिरात शिवसेना पक्षाकडून अधिकृत दिली आहे. त्यावरूनही आता संभ्रम निर्माण केला जात आहे. पण 2024 ला फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वाधिक जागा आम्ही जिंकणार असाही दावा त्यांनी यावेळी केला.