पहाटेच्या शपथविधीवरून मुनगंटीवार यांच्यानंतर भाजपचा हा नेता ही बोलला, म्हणाला, ”त्यात काही चुकीचं”
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा गौप्यस्फोट केला.
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. त्यातच आता सत्तासंघर्षाचा निकालही लागला आहे. त्यामुळे शिंद-फडणवीस सरकार हे जाणार नाही यावर शिक्का मोर्तब झाला आहे. याचदरम्यान आता 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचं राजडकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्यात काही चुकीचं नाही. आमचा विश्वासघात कोणी करत असेल? आमच्या नावावर आमच्या चेहऱ्यावर आमच्या नेतृत्वावर मत घेईल आणि मग प्रतारणा करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाईल तर राजकारणात टीथ फॉर टॅग हे करावं लागतं. त्यामुळे घेतला जो निर्णय होता. त्यावर मुनगंटीवार यांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे.