ठाकरे यांच्या आवाहनावर फडणवीस यांचा पलवार, म्हणाले, पराभव दिसल्यानेच…

| Updated on: May 11, 2023 | 3:57 PM

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. मात्र, राज्यपाल आणि सभापतींच्या निर्णयाबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले. तर 16 आमदारांचा मुद्दा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) घडामोडींवर सुनावणीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला असता, असे स्पष्ट केले. तर 16 आमदारांचा मुद्दा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस पडणार या चर्चांना आता ब्रेक लागला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पत्रकार परिषद घेत ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा का दिला हे सांगत शिंदे आणि फडणवीस यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा असे आवाहन केले होतं. त्यावरून आता फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर निशाना साधत टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेंना लोकांनी साथ सोडल्याचे कळलं होतं. पराभव निश्चित आहे, हे त्यांना माहीत होतं, म्हणूनच त्यांनी राजीनामा देऊन त्यांनी आता नैतिकतेचा आव आनत आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेबाबत बोलू नये. तर ठाकरे यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले होतं हे विसरलेत का असा टोला लगावला आहे.

Published on: May 11, 2023 03:21 PM
Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे यांची कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका; म्हणाले, वस्त्रहरण झालं…
Special Report : उद्धव ठाकरे यांची एक चूक; काय म्हटलयं सुप्रीम कोर्टानं