मविआतील काही आमदार शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात, तर उरले सुरलेलंही राहणार नाहीत!; कोणाचा दावा?

| Updated on: May 10, 2023 | 3:35 PM

शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे सांगितलं आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणी झाली आहे. आता या दोन दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. याची उत्सुकता फक्त राज्यालाच नाही तर देशाला लागली आहे. या सुनावणीनंतर राज्यात काय होऊ शकते यासंदर्भात चर्चा सुरु असतात. अंदाज बांधले जात असतानाच महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे सांगितलं आहे. तर आपण मी अत्यंत जबाबदारी हे विधान करत असल्याचे म्हणत याची प्रचिती येत्या काही दिवसात त्याची महाराष्ट्राला येईल. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व दिल्यावर काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर मविआचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याने काय झालं? तो निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचं म्हणत शरद पवार यांना टोला लगावला आहे. तर महाराष्ट्राचं उद्धव ठाकरे नेतृत्व करू शकत नाहीत, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होऊ शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आमचा विरोधी पक्ष नाहीत. त्यांच्याकडे उरले सुरलेले राहतील का याची शंका असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Published on: May 10, 2023 03:35 PM
राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर शिवसेना नेत्याचा पलटवार; म्हणाले, त्यांच्यात पांढऱ्या काविळीचा दोष
सत्तासंघर्षाच्या निकालावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, ‘…तर लोकशाहीसाठी तो काळा दिवस ठरेल’