धक्कादायक! गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा भोंगळ कारभार उघड झाल्याचे समोर आले आहे. आयोगाकडून 30 एप्रिल रोजी गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येण्यात आहे. मात्र याच्या आधीच हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा काहीच दिवसांवर आलेल्या आहेत. मात्र याआधीच एक धक्कादायक बाब समोर आली असून परिक्षार्थी विद्यार्थ्यांसह आयोगाला ही धक्का बसला आहे. तर यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा भोंगळ कारभार उघड झाल्याचे समोर आले आहे. आयोगाकडून 30 एप्रिल रोजी गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येण्यात आहे. मात्र याच्या आधीच हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे. तर व्हायरल झालेल्या या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट असल्याचे बोलले जात आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत आहेत. यामुळे याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली असून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.