Video : पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण; पिकांचं नुकसान

| Updated on: Mar 07, 2023 | 9:13 AM

Pune Rain Update : पुण्यात ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवत आहे. रात्रीपासून पुण्यात पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा जाणवत आहे. रात्रीपासून पुण्यात पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये रात्री अवकाळी पाऊस कोसळला. आजदेखील हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणेकरांची धुळवड पावसात जाणार आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा पाऊस पडतोय. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचं अवकाळी पावसाने मोठं नुकसान होतंय. गहू, कांदा, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Published on: Mar 07, 2023 09:12 AM
MahaFast News 100 : ”नाव आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. ही शाखा आमचीच”, शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटाला सुनावलं
Buldhana Paper News Update | आता प्रकरण SITकडे, दोषींवर कारवाई निश्चित होईल