स्वत: शेती केलेला माणूस मुख्यमंत्री झालाय, त्यामुळे हे शेतकऱ्याचं राज्य; कुणी केलं कौतुक?
Shahajibapu Patil on CM Eknath Shinde : शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. राज्यातील सत्तासंर्षावरही त्यांनी टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
सोलापूर : सध्याचं राज्यातील सरकार शेतकरी,जनसामान्यांचं आहे. स्वत:ह शेती केलेला माणूस आज मुख्यमंत्री झालाय. त्यामुळे हे शेतकऱ्याचं राज्य आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी अजून महाराष्ट्र नीट पाहिलेला नाही. संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष संपवण्याची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे, असं म्हणत शहाजीबापू यांनी जोरदार टीका केली आहे. सत्ता संघर्षाच्या कायद्याच्या लढाईत सर्व पुरावे आणि बाजु पाहता निर्णय निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजुनेच लागणार आहे. सत्ता संघर्षांची सुनावणी सुप्रीम कोर्टात अजून दोन ते तिन दिवस चालेल, असंही शहाजीबापू पाटील म्हणालेत.
Published on: Mar 15, 2023 03:14 PM