Maharashtra Din : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हुतात्म्यांना अभिवादन

| Updated on: May 01, 2023 | 8:32 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादनं केलं. त्यांनी पुष्पहार अर्पण केले.

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन (Maharashtra State Anniversary) म्हणजेच महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आज आपण सर्वच जण साजरा करत आहोत. आज राज्यात त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादनं केलं. त्यांनी पुष्पहार अर्पण केले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित केला आहे.

Published on: May 01, 2023 08:32 AM
Special Report | 2019 लाच भाजपचा सेनेला संपवण्याचा बेत? शरद पवार यांच्या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट?
युती न होण्याचं कारण सांगत भाजप नेत्यानं केला गौप्यस्फोट; म्हणाले, ‘इगो आडवा…’