Ajit Pawar News : अजित पवारांशी संबंधीत कंपनीवर गुन्हा दाखल, मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख ईडीने टाळला?
या प्रकरणात तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले होते. आता याप्रकरणी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित मेसर्स स्पार्कलिंग कंपनीवर दोषारोप पत्र ईडीने दाखल केलं आहे
मुंबई : महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने कारवाई करत सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतली होती. त्यानंतर या प्रकरणात तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले होते. आता याप्रकरणी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित मेसर्स स्पार्कलिंग कंपनीवर दोषारोप पत्र ईडीने दाखल केलं आहे. मात्र याप्रकरणी अद्याप अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना समन्स देण्यात आलेला नाही किंवा त्यांचे नाव दोषारोपपत्रात नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Published on: Apr 12, 2023 08:57 AM