Sanjay Raut : ‘अजित पवार क्लीन चीट’ प्रकरणावर संजय राऊतांचा आरोप; म्हणाले, तरिही…
अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर धाडी टाकल्या. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देत त्यांचा छळ केला. साखर कारखाना जप्त केला. त्यांना बदनाम करण्याचे काम केले
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अजित पवार व त्यांच्या पत्नीचे नाव वगळले आहे. त्यामुळे ईडीने अजित पवारांना क्लीन चीट दिला का? अशी चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे. तर अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार अशी अफवा आहे. त्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राऊत म्हणाले की, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अजित पवार व त्यांच्या पत्नीचे नाव घेतलेलं नाही. पण अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर धाडी टाकल्या. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देत त्यांचा छळ केला. साखर कारखाना जप्त केला. त्यांना बदनाम करण्याचे काम केले. आणि आता नाव वगळलं. यावरून हेच स्पष्ट होतंय की विरोधकांविरोधात भाजप केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर करतयं.
Published on: Apr 12, 2023 12:42 PM