Video | राज्य सरकारचा मोठा निर्णय, 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस, आणखी नवे निर्णय कोणते ?
राज्य सरकारचा मोठा निर्णय, 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस, आणखी नवे निर्णय कोणते ?
मुंबई : राज्यात कोरोनाला थोपवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 18 ते 44 वर्षापर्य़ंतच्या सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे ठरवले आहे. तसा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळणार आहे. बैठक संपल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
2 कोटी डोस विकत घ्यावे लागणार
राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात 5 कोटी 71 लाख लोक 18 ते 44 वयोगटातील आहेत. त्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. शंभर टक्के लोकांना फ्रि लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याला दोन कोटी डोस विकत घ्यावे लागणार आहेत. एका लसीसाठी 400 रुपये आकारले जातात. त्यानुसार 2 कोटी डोससाठी अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचे म्हटलं तर 12 कोटी डोस द्यावे लागतील. म्हणजे दर महिन्याला 2 कोटी डोस द्यावे लागणार आहेत. आमच्या आरोग्य विभागाच्या 13 हजार संस्था असून त्यांच्या माध्यमाधून दिवसाला 13 लाख डोस देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.