Mumbai Swine Flu News : मुंबईत स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण, तर 7 पैकी 3 मृत्यू एकट्या कोल्हापुरात! रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

| Updated on: Jul 23, 2022 | 8:32 AM

पुण्यात आणि ठाण्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून एकट्या कोल्हापुरात तिघांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय.

कोरोनानंतर आता महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा (Swine Flu News) धोका वाढू लागला आहे. तब्बल सात जणांचा आतापर्यंत स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. तसंच 142 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याची माहितीही समोर आलेली आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. त्यामुळे तापासारखी लक्षणं आढळली, तर अंगावर काढणं धोक्याचं ठरु शकतं, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे वेळी आरोग्य यंत्रणेची मदत घ्यावी, वैद्यकीत तज्ज्ञांचा (Medical Experts) सल्ला घ्यावा, असं आवाहन लोकांना करण्यात येतंय. स्वाईम फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतमध्ये आहे. त्यामुळेही मुंबई महानगर पालिकाही सतर्क झालीय. मुंबईत स्वाईन फ्लूचे (Mumbai Swine Flu) 43, पुण्यात 23, पालघरमध्ये 22, नाशिकमध्ये 17, नागपुरात 14, कोल्हापुरात 14 तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली हद्दीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहे. तर पुण्यात आणि ठाण्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून एकट्या कोल्हापुरात तिघांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय.

Published on: Jul 23, 2022 08:31 AM