नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, पिकांचं मोठं नुकसान

| Updated on: Apr 10, 2023 | 8:36 AM

Nashik News : नाशकात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. प्रशासनाकडून पंचनाम्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पाहा व्हीडिओ...

नाशिक : नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय. द्राक्षासह, कांदा, गहू, मका आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड, बागलाण या तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीमुळे काढणीला आलेला कांदाही भिजला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासनाकडून पंचनाम्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे लवकरात लवकर सरकारी मदत मिळावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

Published on: Apr 10, 2023 08:36 AM
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा अयोध्या दौरा ही शोकांतिका; काँग्रेसची टीका
आमचे मुख्यमंत्री संवेदनशील, घराबाहेर पडतात, नाहीतर आधी…; उद्धव ठाकरेंना कुणाचा टोला?