गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल; महिला आयोगाची भूमिका काय? रूपाली चाकणकर म्हणाल्या…
Gautami Patil Viral Video : गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणावर रूपाली पाटील काय म्हणाल्या आहेत? पाहा...
अहमदनगर : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेंजिंग रूममधील तिचा हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “महिला आयोगाच्या वर्धापन दिनी फेसबुकने महिला आयोगाशी करार केलाय. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. यातून महिलांच्या सायबर गुन्ह्यांची दखल घेणं सोपं जातं.गौतमी पाटीलचं प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना वाटत असेल की आम्ही केवळ या घटनेची दखल घेतली. तर तसं नाहीये. आम्ही सर्वच महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी जागृक आहोत”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Published on: Mar 01, 2023 07:41 AM