पहिली महिला महाराष्ट्र केसरी, प्रतीक्षा बागडी

| Updated on: Mar 25, 2023 | 7:19 AM

सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या

सांगली : महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सांगलीच्याच कन्येन मानाची गदा मिळवली आहे. सांगलीतील प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी झाली. सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या. या स्पर्धेत अंतिम लढत ही सांगलीतील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात झाली. या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.

Published on: Mar 25, 2023 07:19 AM
राहुल गांधींच्या खटल्याबाबत तत्परता दाखवली तेवढी जर…, अरविंद सावंत यांनी काय केला मोठा दावा
आशा भोसले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; म्हणाल्या 90 वर्षे या दिवसाची वाट पाहिली…